बच्चू कडूंपाठोपाठ जानकरही आक्रमक! महाराष्ट्रात महायुतीची डोकेदुखी वाढणार

सांगली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापासूनच जागावाटपावरून सर्वच पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर आमदार बच्चू कडू यांनी आपल्या पक्षासाठी दावा केला आहे. तर रासपच्या महादेव जानकरांनी ५ जागा मिळाल्या नाहीत, तर अपक्ष लढण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे.

आमदार बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या वतीने १५ ते १६ जागांची मागणी केली आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहारला उमेदवारी मिळावी यासाठी दावा करणार असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यांच्या प्रहार पक्षाकडून रवींद्र वैद्य हे खासदार नवनीत राणा विरोधात रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कडू यांना उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी म्हटले आहे की, कोणी कितीही दावा केला तरी तो दावा खोडून काढण्याची ताकद आपल्यात आहे. राणा आणि कडू यांच्यात हा वाद सुरू असतानाच भाजपचा आणखी एक मित्र पक्ष असलेल्या रासपच्या जाणकारांनीही इशारा दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top