नवी दिल्ली :
बंगालच्या उपसागरात काल मध्यरात्री १:२९ वाजता ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने या भूकंपाविषयीची माहिती दिली. भूकंपाची खोली ९.७५ किमी होती. यापूर्वी ३ सप्टेंबर रोजी भारतातील अंदमान निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्तर स्केलवर ४.३ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खोलीवर होता. बंगालच्या उपसागरात स्थित अंदमान आणि निकोबार बेटे भूकंपाच्या बाबतीत सक्रिय आहेत.