बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा
पट्टा १५ जिल्ह्यांत पावसाची शक्यता

मुंबई:

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, धुळे, नाशिक,नंदुरबार यासह विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्याच बरोबर सोलापूर जिल्ह्यासह विदर्भावर अधिक परिणाम होणार अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसेच काही जिल्ह्यात यॅलो अलर्ट जारी केला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्या असल्याने राज्यात अवकाळी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच वाऱ्यांचे प्रवाह देखील खंडित झाल्याने पावसाला पोषक हवामान होत आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर येथे, तर मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान काही जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा दिल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणातही काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यात सध्या दिवसा उन्हाळा रात्री जोरदार थंडी पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असून, उकाडा वाढत आहे. दरम्यान मागच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 36.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

Scroll to Top