कोलकाता – पश्चिम बंगालच्या काही भागात आज सकाळी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपांची तीव्रता ५.१ इतकी नोंदवली गेली.भूकंपाचे केंद्र बंगालच्या उपसागरात ९१ किमोमीटर खोलवर होते. त्यामुळे कोलकाता व पश्चिम बंगालच्या अनेक भागात धक्के जाणवले. ओडीशा, पुरी, बरहामपूर आणि इतर शहरांमध्येही हे धक्के जाणवले. या भूकंपाची नोंद आज सकाळी ६ वाजून १० मिनीटांनी झाल्याची माहिती राष्ट्रीय भूकंप केंद्राने दिली आहे. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक आपल्या घराबाहेर आले. प्रशासनाने सावधगिरीचा उपाय म्हणून बचाव दल तैनात केले. उपसागरात झालेल्या भूकंपामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या.
बंगालच्या उपसागराततीव्र भूकंपाचे धक्के
