बंगळुरु मेट्रोच्या तिकीटीत वाढ

बंगळुरु – नमा मेट्रोच्या तिकीटदरात ४५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. मेट्रो तिकिटांच्या दरवाढीसाठी सरकारने नेमलेल्या समितीच्या शिफारशीनुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे.या समितीने अनेक घटकांचा अभ्यास करुन ही दरवाढ सूचवली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये यासाठी प्रवाशांच्याही सूचना मागवण्यात आल्या होत्या. राज्य सरकार येत्या १७ जानेवारी रोजी या शिफारशी स्विकारण्याची शक्यता असून त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस ही दरवाढ लागू होईल. मेट्रो साठी किमान भाडे १५ रुपये ठरवण्यात आले असून कमाल भाडे ८५ रुपये होणार आहे. ते सध्या ६० रुपये आहे. ही दरवाढ झाली तरी आधीपासून सुरु असलेल्या काही सवलती कायम ठेवण्यात येणार आहेत. मागील दरवाढ २०१७ साली करण्यात आली होती. त्यावेळी बंगळुरु मेट्रोचा विस्तार केवळ ४३ किमोमीटर होता आता तो ७६ किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत बंगळुरु मध्ये १७५ किलोमीटर होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top