*१ आणि २ एप्रिल रोजी बँका बंद राहणार
मुंबई
आर्थिक वर्ष २०२२-२३ आता अंतिम टप्प्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बँकांना त्यांच्या सर्व शाखा ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बँकेचे कामकाज रविवारीही सुरु राहणार आहे. मात्र, १ आणि २ एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहेत. याशिवाय एप्रिलमध्ये बँकांना पाच सुट्ट्या असणार आहेत.
आरबीआयने जारी केलेल्या आदेशानुसार, \’सरकारी चेक जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग आयोजित केले जाणार आहे. यासाठी पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम्स विभाग (डीपीएसएस) आवश्यक निर्देश जारी करणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या व्यवहारांचा अहवाल देण्यासाठी रिपोर्टिंग विंडो ३१ मार्च ते १ एप्रिल रोजी दुपारपर्यंत सुरु असणार आहे. २०२२-२३ हे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपत आहे. या तारखेपर्यंत सर्व सरकारी व्यवहार पूर्ण करावीत. नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) प्रणालींद्वारे होणारे व्यवहार ३१ मार्चच्या मध्यरात्री १२ पर्यंत सुरू राहणार आहेत.
१ आणि २ एप्रिल रोजी बँकांना आरबीआयने सुट्टी दिली आहे. त्याशिवाय ४ एप्रिलला महावीर जयंती, ७ एप्रिलला गुड फ्रायडे, ८ एप्रिलला दुसरा शनिवार, १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर जयंती, २२ एप्रिलला ईदची सुट्टी असल्याने आणखी पाच बँका बंद राहणार आहेत.