मुंबई – मंत्रालयात प्रवेशासाठी सुरू करण्यात आलेल्या फेस डिटेक्शनवर आधारित एफआरएस तंत्रज्ञानामुळे आता मंत्रालयाच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. त्यासोबत शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता आणि गती घेण्यास मदत होणार आहे.या प्रणालीवर शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींना नोंदणी करावी लागणार आहे.
एफआरएस तंत्रज्ञानामुळे मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख सुनिश्चित होणार असून योग्य व्यक्तींना अधिकृतपणे प्रवेश मिळणार आहे. त्यासोबतच अनुचित प्रवेश रोखले जाणार आहे.त्यामुळे मंत्रालयातील गर्दीवर नियंत्रण येऊन शासकीय कामकाजात अधिक सुलभता आणि पारदर्शकता येणार आहे.मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फेशियल रिकॉग्नीनेशन आणि आरएफआयडी कार्ड आधारित प्रवेश देण्यात येणार आहे.माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त मंत्रालयातील १० हजार ५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तपशिल याप्रणालीमध्ये सादर करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने कार्यान्वयन कंपनीमार्फत सर्व प्रवेशद्वार येथे फेशियल रिकॉग्नीनेशन यंत्रणा प्रस्थापित करण्यात आली आहे.ही यंत्रणा ‘गो लाईव्ह’करण्यात आली आहे.