हेलसिंकी – जगातील सर्वांत तरुण पंतप्रधान समजल्या फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन या सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आपले पद सोडणार आहेत. पण हे पद सोडत असताना त्यांनी आणखी एक निर्णय जाहीर केला आहे. सना मरिन
आणि तिचा पती मार्कस रायकोनेन या दोघांनी घटस्फोटासाठी एकत्र अर्ज दाखल केला आहे. दरम्यान, ‘१९ वर्षे एकत्र राहिल्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत,” असे मरिनने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये म्हटले आहे.
सना हिने मार्कस रायकोनेन हा अजूनही आपला सर्वोत्तम मित्र असल्याचे म्हटले आहे. मरिनने सांगितले की “आम्ही घटस्फोट घेतला तरी एक कुटुंब म्हणून एकत्र वेळ घालवू.” साना मरिन आणि मार्कस दोघेही ३७ वर्षांचे असून त्यांना इमा अमालिया मरिन ही दोन वर्षांची मुलगी सुद्धा आहे. फिनलंडच्या पंतप्रधान साना मरिन यांनी १६ वर्षं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यांतर आपला मित्र मार्कस रायक्कोनेन यांच्याशी २०२० लग्न केले होते.
दरम्यान, २०० सदस्यांच्या संसदेत मरिन यांच्या सोशल डेमोक्रॅट पक्षाचे ४३ खासदार आहेत. त्या तिसऱ्या स्थानावर आल्या आहेत. त्याचप्रमाणे ४८ जागा पुराणमतवादी नॅशनल कोलिशन आणि ४६ जागा अँटी-इमिग्रेशन फिन्स पार्टीला मिळाल्या आहेत. नॅशनल कोलायशन सध्या फिन्स पार्टीसोबत सरकार स्थापन करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत.