फडणवीस, परमबीर सिंह, वाझे एकच! अनिल देशमुख यांचा जोरदार हल्लाबोल

मुंबई- फडणवीस, परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे तिघेही एकच आहेत. फडणवीसांच्या जवळचे असणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना मनसुख हिरेनच्या हत्येची माहिती होती. त्यांनीच हत्या घडवून आणली. हे दोघे काय करतात, हे फडणवीस यांना माहीत असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला.
अनिल देशमुख पुढे म्हणाले की, मनसुख हिरेन यांची हत्या झाल्यावर त्यांचा मृतदेह सकाळी सापडला. जोपर्यंत मृतदेहाची घरच्यांकडून ओळख पटत नाही, तोपर्यंत त्याबाबत माहिती देता येत नाही. फडणवीस यांना एवढेही ज्ञान नाही याचे मला आश्चर्य वाटते. देवेंद्र फडणवीस हे स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांचा गृहमंत्रिपदाचा किती अभ्यास आहे हे यातून दिसत आहे.”
अनिल देशमुख यांच्या वक्तव्यानंतर फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख यांना माझा एकच प्रश्न आहे. मला माहीत आहे, याचे उत्तर ते देणार नाहीत. तशी अपेक्षादेखील माझी नाही. मात्र त्यांना केवळ एकच सवाल आहे. मनसुख हिरेनची हत्या होणार, हे अनिल देशमुख यांना माहीत होते की नाही? याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. मनसुख हिरेन यांना गायब करण्यात आले होते आणि त्यांची हत्या होऊ शकते, अशी भीती मी व्यक्त केली होती. त्यामुळे माझे स्पष्ट मत आहे की, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत उत्तर द्यावे. ते यावर बोलणार नाहीत. मात्र याचे उत्तर नक्कीच कधी ना कधी बाहेर येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top