ठाणे- ठाणे महापालिका अंतर्गत टिकुजिनीवाडी परिसरात वनविभागाने फलक लावले आहेत. त्या फलकावर ‘अतिक्रमण करू नका, प्लास्टिक वापरू नका’ अशी सूचना ठळक अक्षरात लावली आहे. प्लास्टिक वापरल्यास कमीत कमी २५ हजारांचा दंड तसेच ३ ते ७ वर्षांचा कारावास होऊ शकतो असेही लिहिले आहे, मात्र त्या फलकावरच भंगारातील प्लास्टिक डब्बे लावले आहेत. फलकाच्या बाजूला म्हणजेच वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. परंतु या सर्वावर वनविभागाने अजून कोणतीही कारवाई केली नाही.
“प्लास्टीक वापरू नका” बोर्डवरच प्लास्टीकचे डबे
