नवी दिल्ली- दिल्लीतील भाजपाचे उमेदवार रमेश बिधुरी मी कालकाजीतील सर्व रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे बनवीन, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून हा असभ्यपणा असल्याचा आरोप केला आहे. रमेश बिधुरी कालकाजीमधून मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. एका व्हिडिओमध्ये ते असे बोलताना दिसत आहेत की, लालूंनी वचन दिले होते की ते बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवतील, पण ते तसे करू शकले नाहीत. मी तुम्हाला आश्वासन देतो, ज्याप्रमाणे मी ओखला आणि संगम विहारचे रस्ते बनवले, त्याचप्रमाणे मी कालकाजीतील सर्व रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे बनवीन.
या वक्तव्यावर पवन खेरा यांनी आक्षेप घेतला. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, हे वक्तव्य या माणसाची नव्हे तर, त्याच्या मालकांची मानसिकता दर्शवत नाही आहे. यावरून तुम्हाला भाजपाच्या या नीच नेत्यांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूल्ये दिसतील.