प्रसिद्ध शेगाव मंदिर परिसरात हायटेक ऑटोमोटेड वाहनतळ

बुलढाणा – शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानने आता मंदिर परिसरात हायटेक आणि ऑटोमोटेड वाहनतळ उभारण्यात आले आहे. त्यामुळे शेगावात येणाऱ्या भाविकांच्या कार पार्किंगचा प्रश्न मिटला आहे. ही वाहनतळाची सेवा पूर्णपणे मोफत ठेवली आहे.

संत गजानन महाराज यांच्या दर्शनाला येणाऱ्या देश विदेशातील भक्तांच्या सोयीसाठी संस्थानने चार एकर जागेत प्रशस्त आणि भव्य वाहनतळ उभारले आहे. या वाहनतळमध्ये ५ हजार कारसह ३ हजार दुचाकीचे दिवसभरात आवागमन होईल अशी क्षमता आहे. ते संपूर्णतः ऑटोंमोटेड आहे. वाहन पार्क करण्यासाठी ए ते झेंडपर्यंत वेगवेगळे झोन तयार करण्यात आले असून प्रत्येक झोनमध्ये २०० कार पार्क करता येणार आहेत. त्यामुळे भाविकांची मोठी सोय झाली असून मंदिराच्या जवळ असल्याने वाहनातून उतरल्यावर भाविकांना गजानन महाराजांचे सहज दर्शन करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top