मुंबई – गुरुपौर्णिमानिमित्त आज सायंकाळी गणपती बाप्पा मोरया….या जयघोषात मुंबईचा राजाच्या पाद्यपूजन सोहळा लालबागच्या गणेशगल्ली मैदानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात मुंबईचा राजाचे दर्शन घेण्यासाठी घरत गणपती या मराठी चित्रपटातील कलावंतांनी हजेरी लावत गणेशभक्तांचा उत्साह वाढवला. या सोहळ्यादरम्यान गणेशभक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
प्रसिद्ध मुंबईच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न
