प्रसिद्ध ट्यूलिप गार्डन
पर्यटकांसाठी पुन्हा खुले

श्रीनगर
जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यातील हायलँड पार्क कुड येथील रंगीबेरंगी फुलांचे स्वर्ग असलेले ट्युलिप गार्डन आज सकाळी जम्मूच्या फ्लोरिकल्चर, पार्क्स आणि गार्डन्स विभागाने पर्यटकांसाठी पुन्हा खुले केले. नव्या पर्यटन हंगामाची सुरुवात म्हणून हे उद्यान खुले करण्याचे विभागाचे महासंचालक जतिंदर सिंग यांनी जाहीर केले.
विभागाने उधमपूरच्या हायलँड पार्क कुडमध्ये 5 विविध प्रकारांच्या ट्यूलिप्सची 12 हजार रोपे लावली आहेत. उद्यानाच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी स्थानिकांनी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने गार्डनमधील ट्यूलिप्स फुलांची झलक पाहण्यासाठी गर्दी केली आणि तेथे निर्सगाचा आनंद देखील लुटला. जतिंदर सिंग यांनी सांगितले की, ‘यावर्षी जम्मू विभागातील पहिले मोठे ट्युलिप गार्डन रामबनमध्ये मोठ्या क्षेत्रफळावर विकसित केले जात आहे. विभागाने 25 विविध जातींचे 2.7 लाख ट्युलिपची रोपे लावली आहेत. जम्मू आणि काश्मीर हे अतुलनीय सौंदर्य आणि नैसर्गिक लँडस्केप्सने समृद्ध आहे. ट्युलिप गार्डन रंगीबेरंगी फुलांचे स्वर्ग आहे. त्यामुळे पर्यटनांनी ट्युलिप गार्डनला जरूर भेट द्यावी.`

Scroll to Top