प्रयागराज – प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभात वसंत पंचमीनिमित्त उद्या अमृतस्नानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या अमृतस्नानाचा ब्रह्म मुहूर्त सकाळी ५.२३ ते ६.१६ वाजेदम्यान असणार आहे.स्नानासाठी काली मार्ग,धरण आणि संगमकडे जाणाऱ्या रस्त्यांसह मेळा परिसरातील मुख्य रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरी होऊन तीस भाविकांचा मृ्त्यू झाल्याने उद्याच्या अमृत स्नान पर्वात भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रयागराज प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार संगम तटावर २८ मोक्याची ठिकाणे बनविण्यात आली आहेत. याठिकाणी पोलिसांसोबतच शीघ्र कृती दल आणि निमलष्करी दल यांचे संयुक्तपथक तैनात असणार आहे. झालेल्या दुर्घटनेला लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रयागराज महाकुंभात आज तिसरे अमृतस्नान
