कराड- कराड येथून जाणाऱ्या पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे कामअंतिम टप्यात येत आहे. अशातच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकच्या सेवा देण्यास सुरुवात केली आहे. या लोहमार्गावरून ६ जूनपासून दर मंगळवारी ही रेल्वे गाडी सुरू होणार आहे. या गाडीला पुणे ते मिरजेपर्यंत कराड, साताऱ्यासह पाच थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचामोठा फायदा होणार आहे.
कोल्हापूर ते मुंबई दरम्यान रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यासह नवीन रेल्वे गाड्या सुरु करण्याची प्रवाशांची मागणी होती. याच मागण्यांची दखल घेत मध्य रेल्वे सध्या तरी एकच गाडी जूनपासून सेवेत दाखल करत आहे. मात्र, यामध्ये वाढ करत ही गाडी नियमित रोज सुरू करण्याचीही मागणी होत आहे. पुणे-मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचे काम जवळजवळ अंतिम टप्प्यात आले आहे. यातील कोल्हापूर- मिरज-पुणेपर्यंत एका मार्गिकेचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे तर कोल्हापूर-मिरज-शेणोलीपर्यंतचे व पुणे ते वाल्हेपर्यंत दोन्ही मार्गिकेचे दुहेरीकरण व विद्युतीकरण काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर लोणंद ते आदर्की, पळशी ते कोरेगाव या दरम्यानचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाले असल्याने या मार्गावरील पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांची गती वाढली आहे.
प्रत्येक मंगळवारी पुणे मिरज एक्स्प्रेस
