Home / News / प्रतीक्षा संपली, तो पुन्हा येतोय! फडणवीसांसाठी बॅंनरबाजी

प्रतीक्षा संपली, तो पुन्हा येतोय! फडणवीसांसाठी बॅंनरबाजी

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना मुंबईच्या भाजपा कार्यालयाबाहेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅंनर...

By: E-Paper Navakal

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना मुंबईच्या भाजपा कार्यालयाबाहेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनार्थ बॅंनर लावण्यात आला आहे. “प्रतीक्षा संपली, २३ नोव्हेंबर, नव महाराष्ट्राची नवगाथा लिहायला, तो पुन्हा येतोय…” असा मचकूर असलेल्या या बॅनरवर देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो आहे. त्यासोबत या बॅनरवर २९ नोव्हेंबरला मतदान, २३ नोव्हेंबरला मतमोजणी, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असा मचकूर देखील छापण्यात आला.

Web Title:
संबंधित बातम्या