सातारा – प्रतापगड किल्ल्यावर सुरू असलेल्या कामाबाबत स्थानिक शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याची जतन आणि देखभाल करण्यासाठी राज्य सरकारने १६० कोटींहून अधिक निधी दिला आहे. मात्र, या किल्ल्याच्या ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत आहे. किल्ल्याच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे, तो पुन्हा शिवकालीन स्वरूपात दिसावा अशी अपेक्षा आहे, परंतु सध्या सुरु असलेल्या कामामुळे तो बकाल बनत आहे, असा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. त्यामुळे आता मदत आणि पुनर्विकास मंत्री मकरंद पाटील यांनी तातडीने हे काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यापुढेही या कामाची जबाबदारी पुन्हा त्याच ठेकेदाराला देण्यात येऊ नये, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.
प्रतापगडावर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शिवप्रेमी नाराज
