प्रक्षोभक भाषणप्रकरणी भाजपच्या निलंबित आमदारावर गुन्हा दाखल

मुंबई – भडकाऊ आणि प्रक्षोभक भाषण केल्याच्या प्रकरणात भाजपचे निलंबित आमदार टी राजा यांच्या विरोधात आता मुंबई पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. टी राजा सिंह यांनी मुंबईत २९ जानेवारी रोजी एका जाहीर सभेत द्वेषपूर्ण भाषण केले होते.

याप्रकरणी मुंबईत दादर पोलिसांनी तेलंगणातील भाजपचे निलंबित आमदार टी राजा सिंह यांच्याविरोधात २७ मार्च रोजी आयपीसी कलम १५३ ए १(अ) अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे.दोन समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करणार्‍या आणि धार्मिक सलोख्याला बाधा आणणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. एक रॅली काढण्यात आली होती.त्यात सिंग यांनी भाषण केले होते. हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

Scroll to Top