जळगाव – पोलिस भरतीसाठी जळगावच्या तोंडापूर गावातील तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. स्वप्नील राजू पाटील (२९) असे मृत तरुणाचे नाव आहे. स्वप्नील पाटील हा मुंबई येथे पोलिस भरती प्रकियेसाठी गेला होता. भरतीची प्रक्रीया पूर्ण करून स्वप्नील मंगळवारी दुपारी रेल्वेने घराकडे निघाला होता.खर्डी येथे अचानक त्याचा धावत्या रेल्वेतून तोल गेल्याने तो खाली पडला.
डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.रेल्वे पोलिसांनी सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून बुधवारी सकाळी नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह दिला.तो आई-वडिलांचा एकुलता एक विवाहित मुलगा आहे. त्याला एक वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात पत्नी नीलिमा,मुलगा पीयूष,आई -वडिल,काका असा परिवार आहे.पोलिस भरतीसाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मुत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.