पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी गाझामध्ये ३ दिवस युद्धबंदी

जेरूसलेम- गाझा क्षेत्रात सुरू असलेले इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध तीन दिवसांसाठी थांबवले जाणार आहे.हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.पोलिओचा रुग्ण आढळल्याने लसीकरण करण्यासाठी हे युद्ध थांबवले जाणार आहे.

तब्बल २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच पोलिओचा रुग्ण आढळला आहे.यामुळे आता पॅलेस्टिनी भागात लसीकरण मोहीम उद्या रविवार १ सप्टेंबरपासून सुरू असल्याने स्थानिक वेळेनुसार सकाळी ६ ते दुपारी ३ या वेळेत युद्धविराम असणार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी रिक पेपरकॉर्न यांनी सांगितले. लसीकरण मोहीम सर्वात आधी मध्य गाझामध्ये सुरू होईल. तिथे तीन दिवस युद्धबंदी असेल. त्यानंतर दक्षिण गाझाकडे लसीकरण मोहीम राबवली जाईल. तिथे आणखी तीन दिवस युद्धविराम असेल. शेवटी उत्तर गाझामध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे,असे डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्याने सांगितले. युद्धामुळे गाझामध्ये मानवतावादी संकट निर्माण झाले आहे.युद्धात हजारो बळी गेले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top