नवी दिल्ली – अंदमान निकोबार द्विपसमुहाची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलण्यात आले असून हे शहर आता श्री विजय पूरम या नावाने ओळखले जाईल.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ही घोषणा केली.
देशावर राज्य केलेल्या ब्रिटीशांच्या सर्व खाणा-खुणा पुसून टाकल्या जाव्यात अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्या अनुसार पोर्ट ब्लेअरचे नामांतर करण्यात आले आहे,असे शहा यांनी स्पष्ट केले.
ब्रिटीशकालीन पोर्ट ब्लेअर ऐवजी या केंद्रशासित प्रदेशाने स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये दिलेल्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी श्री विजय पूरम हे नाव योग्य ठरेल,असे शहा पुढे म्हणाले.
पोर्ट ब्लेअरचे नाव आता श्री विजय पूरम झाले
