रोम- ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांची प्रकृती मागच्या २४ तासांमध्ये प्रकृती आणखी ढासळली आहे. त्यांना ऑक्सिजन सिलिंडरद्वारे ऑक्सिजन दिला जात आहे. १४ फेब्रुवारीला पोप यांना रोमच्या जेमेली या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरु आहेत.त्यांना श्वसनविकार जडला असून त्यांच्या दोन्ही फुफ्फुसांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे.
पोप यांच्यावर ठरलेले उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे, त्यांना ताप नसल्याचे सांगण्यात आले. त्यांनी रुग्णालयात काही काम आणि वाचन केल्याचंही सांगितल् गेल् होत्. मात्र आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर नेहमीचे उपचार सुरू असल्याचे त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.