Home / News / पैगंबर जयंतीच्या मिरवणुका १६ ऐवजी १८ सप्टेंबरला

पैगंबर जयंतीच्या मिरवणुका १६ ऐवजी १८ सप्टेंबरला

मुंबई – मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणुक (जुलूस)१६ ऐवजी १८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. १७ सप्टेंबरला गणपती विसर्जन...

By: E-Paper Navakal

मुंबई – मोहम्मद पैगंबर जयंतीची मिरवणुक (जुलूस)१६ ऐवजी १८ सप्टेंबरला काढण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. १७ सप्टेंबरला गणपती विसर्जन मिरवणूक आहे. तर इस्लामी कालगणनेनुसार व चंद्रदर्शन झाल्याप्रमाणे १६ सप्टेंबर रोजी पवित्र ईद-ए-मिलादुन्नबी अर्थात पैगंबर जयंतीचा मोठा सण आहे. त्यामुळे पैगंबर जयंतीची जुलूस कधी काढायचा याबाबत मागील काही दिवसांपासून शहरातील उलेमा मंडळी तसेच पोलीस प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती. याच पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील मुस्लिम समुदायानी मोठा निर्णय घेतला आहे. १६ सप्टेंबरला निघणारा जुलूस मुस्लिम समाजाने पुढे ढकलला आहे. १६ सप्टेंबरला निघणारा जुलूस आता १८ सप्टेंबरला निघणार आहे. महाराष्ट्रात ईद-ए-मिलाद १८ सप्टेंबरला रोजी साजरी करण्याचा कौतुकास्पद निर्णय मुस्लिम बांधवांनी एकमताने घेतलेला आहे. खिलाफत हाऊसमधून हा निर्णय घेतला आहे. गणेश विसर्जनादरम्यान शांतता राहावी म्हणून मुस्लिम समुदायाने हे मोठे पाऊल उचलले आहे.

गेल्या वर्षी सुद्धा अनंत चतुर्दशी आणि पैगंबर जयंती एकाच दिवशी होती. त्यावेळी सुद्धा येथील मुस्लिम बांधवांनी दुसऱ्या दिवशी जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. यावर्षी सुद्धा तोच योग आल्याने मुस्लीम बांधवांनी आपला सण दोन दिवस उशिरा साजरा करण्याचा निर्णय घेतला. मुस्लीम बांधवांच्या या निर्णयाचे पोलीस प्रशासनासह सर्वांनीच स्वागत करीत कौतुक केले आहे.

Web Title:
संबंधित बातम्या