कैरो – गाझा पट्ट्यातल्या पॅलेस्टिनींना हंगामी स्वरुपात इजिप्त आणि जॅार्डनने सामावून घ्यावे, अशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुचवलेला प्रस्ताव अरब देशांनी फेटाळला. याबाबत इजिप्त, जॅाईन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, कतार, पॅलेस्टिनी प्राधिकरण आणि अरब लीग यांनी एक संयुक्त निवेदन जारी केले. गाझा आणि वेस्ट बॅंकेतील पॅलेस्टिनींना त्यांच्या भूमीतून बाहेर काढून अन्य देशांत स्थलांतरित करण्याला या देशांनी विरोध केला.ट्रम्प म्हणाले की, “गाझातील २.३ दशलक्ष पॅलेस्टिनी सध्या दक्षिण गाझामध्ये विस्थापित झाले आहेत. गाझाच्या फेरउभारणीला वेळ लागू शकतो. या कालावधीत या पॅलेस्टिनींना हंगामी स्वरुपात जॅार्डन आणि इजिप्तमध्ये हलवले जावे.” या प्रस्तावावर अरब देशांनी सांगितले की, “या योजनांमुळे प्रदेशाची स्थिरता धोक्यात येऊ शकते. संघर्ष वाढण्याचा धोका देखील निर्माण होतो. तेथील लोकांमध्ये शांतता आणि सहअस्तित्वाच्या शक्यता कमी होतात.”
पॅलेस्टिनींबाबतचा ट्रम्प यांचा प्रस्ताव अरब देशांनी फेटाळला
