पॅरिस – पॅरालिम्पिकमध्ये भारताला दुसरे सुवर्णपदकपॅरिसपॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी आजही सुरूच राहिली. बॅडमिंटनपटू नितीश कुमारने पुरुष एकेरीच्या SL3 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात त्याने ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी अवनी लेखरा हिने नेमबाजीत सुवर्णपदक पटकावले होते.