मुंबई
सेल्फी घेण्यावरून झालेल्या बराड्याप्रकरणी सपना गिलच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने क्रिकेटपटू पृथ्वी शॉसह ११ जणांना नोटीस बजावत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी माझ्याविरोधातील दाखल गुन्हा रद्द करावा, अशी मागणी करत सपना गिलने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरून हायकोर्टाने ही नोटीस दिली आहे.
मुंबईतल्या विले पार्ले पूर्व येथे बॅरेल मॅन्शन क्लबबाहेर हा प्रकार घडला होता. सपना गिल आणि तिच्या काही मैत्रिणी पृथ्वी शॉबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्यात बाचाबाची आणि पुढे धक्काबुक्की झाली. सपना गिल आणि तिच्या मैत्रिणींनी आपल्याशी गैरव्यवहार केल्याचा आरोप करत पृथ्वी शॉने रीतसर तक्रारही दाखल केली. या तक्रारीनंतर सपना गिलविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली. त्यानंतर आता सपना गिलने हायकोर्टात धाव घेत माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
पृथ्वी शॉ अडचणीतहायकोर्टाची नोटीस
