पुरोहित यांची आरोपमुक्तीची
याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली – 2008 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची आरोपातून मुक्त करण्याची विनंती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच हायकोर्टाच्या निकालात कोणताही हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोटाने नकार दिला.
पुरोहित यांच्या याचिकेवर आज सकाळी न्यायमूर्ती हषिकेश रॉय आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. खंडपीठाने सांगितले की, ‘या याचिकेवर आम्ही कोणताही विचार करणार नाही. कोणताही हस्तक्षेप देखील करणार नाही. प्रसाद पुरोहितांच्या विरोधात खटला सुरु ठेवावा.` आता हा खटला सुरुच राहणार असल्याने पुरोहितांच्या अडचणीत भर पडली आहे.
29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील एका प्रार्थना स्थळाच्या आवारात बॉम्बस्फोट झाला होता. यात 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले तर अनेकजण जखमी झाले होते. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह इतर संशयितांना अटक करण्यात आली होती. या आरोपींवर दहशतवादी कृत्य करणे, षडयंत्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच गुन्हेगारी कट, खूव, खूनाचा प्रयत्न, दुखापत करणे, आणि दोन धार्मिक गटात वैर वाढवणे यांसह स्फोटक पदार्थ कायद्यातील संबंधित तरतुदींचाही समावेश करण्यात आला आहे.

Scroll to Top