कोल्हापूर – पंचगंगा नदीच्या पुराचे कारण शोधण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या पथकाने आज सोमवारी पंचगंगा नदीची पाहणी केली. यामध्ये नदीवरील पुलाचा पुरावर काही परिणाम होतो का, यांसह इतर शास्त्रीय कारणांचा अभ्यास केला जाणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात २००५ ,२०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या पुराची कारणे शोधण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर पाटबंधारे विभागाने आज पंचगंगा नदीवर असणाऱ्या पुलाचा कोणता परिणाम होतो का याची पाहणी केली. जुन्या आणि कमी उंचीच्या पुलामुळे नदीतून पाणी वाहताना अडथळा निर्माण होतात का, याची माहिती आज घेण्यात आली. यामध्ये आणखी काही दिवस याचा अभ्यास करून अंतिम अहवाल तयार करण्यात येईल. या अहवालामध्ये पुराची सर्व कारणे नमूद केली जातील. तसेच पुलाचा अडथळा ठरतो का यावरही भाष्य केले जाणार आहे. आज पाटबंधारेच्या अभियंता स्मिता माने यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या बोटीतून जाऊन पुलाची पाहणी करण्यात आली.
पुराचे कारण शोधण्यासाठी पंचगंगा नदीची पाहणी
