पुणे – पुरंदर तालुक्यातील खानवडी येथील गट नंबर ४३ च्या २० हेक्टर ५० आर जागेतील मुख्यमंत्री गीर कुपी वाहिनी योजना अंतर्गत सौरऊर्जा यासाठी संपादित केलेल्या जमिनीवरील झाडे काढण्यास परवानगी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी ८८३ झाडांची कत्तल केली जाणार आहेत.
खानवडी गट नंबर ४३ मध्ये २० हेक्टर ५३ आर जागेचा ताबा कार्यालय आणि शाखा कार्यालय यांनी अतिरिक्त कार्यान्वित अभियता उपविभाग बारामती यांना आगाऊ दिला आहे.या ताबा क्षेत्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजनेंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमीनवरील झाडे काढण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंता उपविभाग बारामती यांनी परवानगी अर्ज केला होता.
त्याअनुषंगाने खानवडी येथील जमीन गट क्रमांक ४३ मधील दोन पंचासह झाडे परवानगीबाबत या अर्जावरील संदर्भान्वे वनपाल सासवड यांनी पाहणी व पंचनामा केला आहे.या पंचनाम्याप्रमाणे संबंधित क्षेत्र विकसीत करताना अडचण ठरणारी झाडे तोडताना किंवा काढताना शेजारील लोकांना त्रास होणार नाही, झाडावर असणाऱ्या पक्षांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी, या सूचनांवर परवानगी दिली आहे.