Home / News / पुण्यात ७७ हजारांच्या बनावट नोटा जप्त

पुण्यात ७७ हजारांच्या बनावट नोटा जप्त

पुणे – पुण्यात बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली. गौरव रामप्रताप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

पुणे – पुण्यात बनावट नोटा बाळगणाऱ्या एकाला समर्थ पोलिसांनी अटक केली. गौरव रामप्रताप असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो गुजरातमधील जामनगरचा आहे. त्याच्याकडून ५०० रुपये दराच्या १४२ आणि शंभर रुपये दराच्या ६१ अशा ७७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. याबाबत पोलीस शिपाई लखन शेटे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
एक व्यक्ती रास्ता पेठेतील उंटाड्या मारुती मंदिराजवळ थांबला असून, त्याच्याकडे बनावट नोटा असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गौरव रामप्रतापला ताब्यात घेतेले. गौरव रामप्रतापला बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी अटक केली असून, त्याने बनावट नोटा कोणाकडून आणल्या याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या