पुणे- पुण्यात २८ तासानंतर गणरायाच्या विसर्जन मिरवणुका संपल्या. काल सुरू झालेल्या मिरवणुका आज दुपारी तीन वाजता संपल्या. पुणे पोलिसांनी मिरवणूक संपल्या असे जाहीर केले. तब्बल २८ तास पुण्यातील विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. पुण्यातील प्रमुख चार रस्त्यांवरून या मिरवणुका निघाल्या होत्या. मानाच्या गणपतीसह इतर मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली होती. मिरवणूक संपल्यानंतर अलका चौकामध्ये स्वच्छता मोहीम राबवली गेली. गेले २८ तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. मिरवणुका संपल्यानंतर काही वेळात मनपाच्या स्वच्छता विभागाकडून या ठिकाणी स्वच्छता राबवून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |