पुणे – शिरूरच्या इनामगावमध्येे वाहनाची जोरदार धडक बसून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने एकच हळहळ व्यक्त होत आहे. तुलसी राकेश यादव (19) आणि किसन भिमाजी आल्हाट (57)असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तुलसी ही मुळची छत्तीसगडची आहे. सद्धाची इनामगावात राहत होती. किसन हे इनामगावाचेच रहिवाशी आहे.
न्हावरा काष्टी या नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यावर तुलसी यादव आणि किसन आल्हाट हे दोघे इनामगाव येथून पायी घरी जात होते. काष्टी बाजूकडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने दोघांना धडक दिली. यावेळी दोघांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मांडवगण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणी राकेश यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.