पुण्यात लोकवस्तीत बिबट्याचा वावर

पुणे – वाघोली शहरामध्ये जुन्या भाडळे वस्तीत डिकॅथलॉन दुकानाच्या शेजारी असलेल्या वस्तीमध्ये बिबट्याचा वावर आढळला.
चार दिवसांपूर्वी परिसरातील मेंढपाळाच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्यात मेंढीचे एक पिल्लू फस्त केले होते .
हा परिसर लोकवस्तीचा असून शेजारी अंगणवाडी आहे. यामुळे येथील लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
या परिसरातील रहिवाशांनी या ठिकाणी पिंजरा लावण्याची अनेक वेळा मागणी केली होती , मात्र याकडे दुर्लक्ष असून मोठी दुर्घटना घडल्यानंतर पिंजरा लावणार का असा प्रश्न स्थानिकांकडून विचारण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top