पुणे – केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गिरीश बापट यांच्या निवासस्थानी भेट दिली. काही दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे पुण्यात निधन झाले. राजनाथ सिंह यांनी बापट कुटुंबीयांचे सांत्वन भेट केले. यावेळी गिरीश बापट यांच्या पत्नी, पुत्र गौरव, सून स्वरदा आदी उपस्थित होते.
राजनाथसिंह यांनी बापट कुटुंबीयांची विचारपूस करत गिरीश बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला. या भेटीनंतर गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट म्हणाले, “देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी वेळात वेळ काढून आमच्या कुटुंबीयांची भेट घेतली. २०१९ साली बापट खासदार होण्याआधी पासून राजनाथ सिंह आणि गिरीश बापट यांची मैत्री होती. २००३ सालापासून राजनाथ सिंह आणि आमचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध होते. राजनाथजी राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी बापटांकडे अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्या सर्व आठवणींना राजनाथ सिंह यांनी उजाळा दिला.”