पुणे – भरधाव खासगी बसने समोरून येणाऱ्या सहा वाहनांना धडक दिल्यामुळे एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उंड्री परिसरातील एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर रविवारी रात्री सव्वासात वाजता घडली. अन्य पाच जण जखमी झाले असून त्यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
प्रशांत भानुदास घेमुड (37) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. रिक्षाचालक मधू कुवर, रिक्षातील प्रवासी अलिस्टर मर्चंट, मालवाहतूक टेम्पोमधील इस्माईल सय्यद, रफिक देशमुख हे चौघे गंभीर जखमी झाले. एनआयबीएम ते कडनगर रस्त्यावर ऑर्किड पॅलेससमोरील उतारावर वाय जंक्शनजवळ बसचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे ही बस उतारावरून भरधाव सुटली. बसने समोरून येणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली, त्यात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य जखमींवर ससून आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात तीन मोटारींसह टेम्पो, रिक्षा आणि एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
पुण्यात बसची 6 वाहनांना धडक एकाचा मृत्यू! पाच जण गंभीर
