पुणे
पुण्यातील आयटी पार्क हिंजवडीतील लक्ष्मी चौकात आज एक होर्डिंग कोसळले. पुण्यात आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक सोसाट्याचा वारा व पाऊस सुरू झाला. त्यामुळे हे होर्डिंग रस्त्यावर तिरपे कोसळले. दरम्यान, या घटनेत एका मोटारीचे किरकोळ नुकसान झाले आहे. यावेळी बाघ्यांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडीदेखील झाली होती. याआधी किवळे येथे १७ एप्रिल रोजी एका दुकानावर लोखंडी होर्डिंग कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी महापालिका क्षेत्रात बेकायदा फलक पाडण्याची विशेष मोहीम राबवली होती. मात्र, तिची अंमलबजावणी नीट होताना दिसत नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.