पुणे – नवी पेठ परिसरातील गांजवे चौकात एका इमारतीच्या टेरेसवर असलेल्या ग्रंथालयाला अचानक आग लागली. ही घटना आज पहाटे ६ वाजताच्या सुमारास घडली.
या आगीत फर्निचर, संगणक आणि पुस्तकांसह विद्यार्थ्यांचे लॅपटॉप, पुस्तके, नोट्स आणि अनेक विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रमाणपत्रे जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाड्या आणि पाण्याचे टँकर दाखल झाले. यामुळे आग आटोक्यात आण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले परंतु ग्रंथालयाचे या आगीत मोठे नुकसान झाले आहे. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही असे पुणे शहर अग्निशमन विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले. अग्निशमन दलाकडून या परिसरातील इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. प्राथमिक माहितीनुसार, आग ग्रंथालयाच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर लागली. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तवली जात आहे.
ग्रंथालायातील शिवम जाधव या विद्यार्थ्याने या आगीबाबत माहिती दिली. तो म्हणाला की, ‘माझे सगळी कागदपत्रे जळाली. पुस्तकेही आगीत खाक झालं. रात्री नऊ वाजता लायब्ररी पेस्ट कंट्रोलसाठी बंद केल्यावर आम्ही रुममध्ये गेलो. सकाळी ही दुर्घटना घडली