पुणे:
केंद्र शासनाने सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात ’देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेअंतर्गत ’भारत गौरव’ रेल्वेसेवा सुरू केली. या योजनेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, या सेवेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना कमी पैशांमध्ये देशातील विविध पर्यटनस्थळे, धार्मिक तीर्थस्थळे, ऐतिहासिक ठिकाणे पाहायला मिळत आहे. भारत गौरव’ रेल्वेसेवा पुण्यातूनसुध्दा सुरू झाली आहे. 28 एप्रिल रोजी पुण्यातून पहिली ‘भारत गौरव पर्यटक ट्रेन’ ट्रेन सोडण्यात येणार आहे.
रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या ट्रेनचे उद्घाटन करणार आहे. ही ट्रेन दहा दिवस देशातील मुख्य धार्मिक स्थळे दाखवणार आहे.ही गाडी पुण्यातून जगन्नाथ पुरी,कोलकत्ता,गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेट देणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या आयआरसीटीसीकडून या सेवेचे नाव ’पुरी गंगासागर दिव्य काशी यात्रा’ असे ठेवण्यात आले आहे.