पुणे – ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पुणे शहरातील १ हजारांपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. २५ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हे सर्व सीसीटीव्ही केबल तुटल्यामुळे बिनकामाचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून महापालिकेच्या विद्युत विभागाने पुण्यात २,९०९ सीसीटीव्ही बसविले होते. मात्र यातील १,०५४ सीसीटीव्ही बंद आहेत. सीसीटीव्ही महापालिकेने बसविलेले असले तरी त्याचे नियंत्रण पोलिसांकडे आहे. संभाजी पोलीस चौकीत ३०, नारायणपेठ येथे २७, शनिवार पेठेत ३५, खडकमध्ये ३९, सेनादत्त येथे ३४, मंडईत ३८, मीठगंजमध्ये १३, पेरूगेट २६ सहकारनगरात २४, महर्षीनगरात ७१, मार्केटयार्ड येथे ४२, वानवडी बाजारात २१, घोरपडीत ९ विश्रांतवाडीत ७, समर्थ पोलीस ठाणे १३९, गाडीतळात १८ कसबा पेठ येथे ३३, जनवाडीत ४०, अलंकारात ८, कर्वेनगरात ७१, डहाणूकर येथे १५, हॅपी कॉलनीत ६, ताडीवाला रस्ता येथे ७०, कोंढवा ४९, अप्पर इंदिरानगरात १००, रामोशी गेट येथे २, काशेवाडीत ४, पेरुगेट – २, सहकारनगरात ५, सहकारनगरात तळजाईमध्ये ३, पर्वती दर्शन ४, लक्ष्मीनगरात ४, वानवडी बाजारात २, तुकाई दर्शन ६, कोरेगाव पार्क २, विश्रांतवाडीत ४, कसबा पेठ ८, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ४, शिवाजीनगर चौकी ५, पांडवनगर ९ जनवाडी ४, कोथरूड पोलीस ठाणे ९, कर्वेनगरात २ सीसीटीव्ही बंद आहेत.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |