पुण्यातील सर्व टेकड्यांवरसर्च लाईट व सायरन बसवणार

पुणे -गेल्या पाच ते सात दिवसांत पुण्यात अत्याचाराच्या चार घटना झाल्या आहेत. पुणे शहरातील गुन्हेगारीही वाढली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता शहरातील टेकड्यांवर आणि घाटांमध्ये सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या टेकड्यांवर सायरनसुद्धा लावण्यात येणार आहेत.

३ ऑक्टोंबर रोजी बोपदेव घाटात एका २१ वर्षीय युवतीवर तिघांनी सामुहिक अत्याचार केला होता. त्या प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. या प्रकरणातील तिन्ही आरोपींना अजून पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. या प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी घाट आणि टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तसेच शहरातील सर्व टेकड्यांवर सायरन सुद्धा बसवले जाणार आहेत. आपत्कालीन परिस्थितीत हा सायरन महत्त्वाचा ठरणार आहे.

काही दिवसांपूर्वी पुण्यातील बाणेर टेकडीवर एका तरुणाला काही चोरट्यांनी लुटले होते. पुण्यातील टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या आणि लूट थांबवण्यासाठी आता पोलिसांकडून मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुन्हेगार गुन्हे करण्यासाठी निर्जन स्थळ शोधतात. त्यामुळे गुन्हेगारांना गुन्हे करण्यासाठी कोणतीही जागा मिळू नये, यासाठी पोलिसांनी पावले उचलली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top