पुण्यातील मार्केटयार्डमध्येरद्दीच्या गोदामाला आग

  • २ टेम्पो जळून खाक

पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड येथील कागद-पुठ्ठा गोदामाला मध्यरात्री १ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गोदामातील मोठा माल जळून भस्मसात झाला. अग्निशामक दलाच्या ९ गाड्या आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे. आगीचे कारण समजू शकले नाही. तसेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. दोन टेम्पो जळून खाक झाले.

मार्केड यार्ड परिसर ही पुण्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथे अनेक गोदामेदेखील आहेत. सगळे गोडाऊन एकमेकांना लागून असल्याने आग पसरण्याचा मोठा धोका होता. मात्र वेळीच आग आटोक्यात आली. तब्बल ५००० स्क्वे.फुट गोडाऊनमधे कागद रद्दी व काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या मालाला आग लागली होती. ही आग एवढी भीषण होती की आगीचे लोळ दूरपर्यंत दिसत होते. जवानांनी तातडीने गोडाऊनचा मुख्य दरवाजाचे बोल्ड कटरच्या साह्याने कुलुप तोडत चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू करून आतमधे कोणी कामगार अथवा नागरिक अडकला नाही ना याची ही खात्री केली. आग मोठी असल्याने जवानांना बचाव कार्यात अडथळे येत होते. यामुळे अतिरिक्त मदत मिळवण्यासाठी अधिक अग्निशमन वाहनांना बोलावण्यात आले. शेजारीच रहिवाशी इमारत असल्याने आग त्या दिशेने पसरु नये याची विषेश खबरदारी घेत पाण्याचा मारा सुरू ठेवत कर्मचाऱ्यांनी तासाभरात आग आटोक्यात आणली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top