पुणे- पुण्यातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. ही कुस्ती स्पर्धा अवैध असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेने केला आहे. ‘महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही शासनमान्य आहे. गेल्यावर्षी याच परिषदेने कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेशिवाय इतर कोणीही स्पर्धेचे आयोजन करू शकत नाही. कोणी जर असे केले तर ती स्पर्धा अनाधिकृत ठरते’, असे आयोजक सुधीर पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन धाराशिवमध्ये करण्यात आले आहे. १६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ही कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. धाराशिवमध्ये आज स्पर्धेच्या तयारीसाठी कुस्तीगीर परिषदेच्या सभासदांची बैठक पार पडली. या स्पर्धेमध्ये ९५० कुस्तीगीर सहभागी होतील अशी माहिती ही आयोजकांनी दिली आहे.
पुण्यातील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अवैध! राज्य कुस्तीगीर परिषदेचा आरोप
