पुणे :- महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेची (वज्रमूठ सभा) सुरुवात संभाजीनगरातून झाली होती. आता मे महिन्यात पुण्यात ही सभा होणार. या सभेच्या नियोजनासाठी आज महाविकास आघाडीच्या पुणे शहरातील नेत्यांची बैठक झाली. यात पुणे शहरातील नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सभा घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. महाविकास आघाडीची सभा १४ मे २०२३ रोजी रविवारी होणार आहे. या सभेची जबाबदारी स्वतः अजित पवार यांच्यावर असणार आहे. महाविकास आघाडीच्या सभेसाठी कुठलाही मानपान होणार नाही. आम्ही सगळे एकाच मंचावर असू, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप व अरविंद शिंदे यांनी केले.