पुणे – बालेवाडीतील म्हाळुंगे भागातील नानाची चाळ येथे आज अचानक आग लागली. या आगीत पत्र्याची १८ घरे जळून खाक झाली. या चाळीत एकूण २० बैठी पत्र्याचे घरे असून त्यात कामगार राहत आहेत. घटनेच्या वेळी कामगार घरात नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील गादी, कपाट, टीव्ही आणि गृहोपयोगी साहित्य जळाले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. या आगीमागचे कारण समजू शकले नाही.
पुण्यातील बालेवाडीत १८ घरांना आग
