पुणे – पुण्यातील कात्रज येथील केदारेश्वर पंपिंग स्टेशनमध्ये मुख्य व्हॉल्व आणि मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम करण्यासाठी गुरुवारी पुणे शहराच्या दक्षिण भागातील कात्रज, बालाजीनगर, आगम मंदिर व कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.बालाजीनगर, पुण्याईनगर, काशिनाथ पाटीलनगर, श्री हरी सोसायटी परिसर, कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, गुजरवाडी रोड, वरखडेनगर, ओमकार, भूषण, उत्कर्ष, राजस यासर्व सोसायट्या व परिसर, कदम प्लाझा परिसर, सुखसागरनगर भाग 1 व भाग 2, आगम मंदिर परिसर, संतोषनगर, अंजलीनगर, दत्तनगर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव रस्ता, वंडर सिटी परिसर, मोरेबाग परिसर, चंद्रभागानगर, भारती विद्यापीठामागील परिसर, कात्रज-कोंढवा रस्ता संपूर्ण परिसर, शिवशंभोनगर, गोकूळनगर. साईनगर, गजानननगर, काकडेवस्ती, अशरफनगर, ग्रीन पार्क, राजीव गांधीनगर व सुपर इंदिरानगरचा काही भाग, इस्कॉन मंदिर परिसर, टिळेकरनगर, कोंढवा बुद्रुक गाव, लक्ष्मीनगर, सोमजी बसस्टॉप परिसर, पुण्यधाम आश्रम रस्ता, साई सर्व्हिस, पारगेनगर, खडीमशिन परिसर, बधेनगर, येवलेवाडी, कामठे-पाटीलनगर आदी संपूर्ण परिसरात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे
पुण्यातील काही भागांतआज पाणी पुरवठा बंद
