पुण्यातील काही ठिकाणी ४ जुलैला पाणीपुरवठा बंद

पुणे- पुणे शहरात गुरुवारी ४ जुलै रोजी काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यात पेठा, हडपसर, येरवडा, कोथरूड, कोंढवा, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता शहराच्या बहुतांश भागांचा समावेश आहे. विविध जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये तांत्रिक कामे करण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. शहरातील खडकवासला जॅक्वेल (नवीन), नवीन पर्वती जलशुध्दीकरण केंद्र (५०० एम.एल.डी.) जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्याअंतर्गत पर्वती एमएलआर टाकी परिसर, पर्वती एचएलआर टाकी परिसर, पर्वती एलएलआर टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, लष्कर जलकेंद्र, एस.एन.डी.टी. (एम.एल.आर.) परिसर व चतुश्रुंगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर व भामा आसखेड जॅक्वेल येथील विद्युतपंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम आहे. त्यामुळे या परिसराच्या अंतर्गत येणाऱ्या भागातील पाणीपुरवठा पुर्णपणे बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top