पुणे -कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीच्या आवारात आज पहाटे दुचाकीला आग लागल्यानंतर इमारतीतील पहिल्या आणि मजल्यावर असलेल्या सदनिकांना या आगीची झळ बसली.रहिवासी वेळीच बाहेर पडल्यामुळे गंभीर दुर्घटना टळली.कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर नताशा एनक्लेव्ह सोसायटी आहे.आज पहाटे साडेतीन वाजता सोसायटीच्या आवारात लावलेल्या एका दुचाकीने पेट घेतल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले.इमारतीतील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीपर्यंत आगीच्या ज्वाळा पोहोचल्याचे जवानांच्या लक्षात आले. गॅलरीतील साहित्य जळाल्याने धूर पसरला होता.जवानांनी घटनेचे सदनिकेत कोणी अडकले नाही,याची खात्री केली.त्यानंतर पाण्याचा मारा करुन आगीवर नियंत्रण मिळवले.
पुण्याच्या कोंढव्यातील इमारतीला आग
