पुणे- पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकाला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे.ही वंदे भारत एक्स्प्रेसची गाडी पुणे-हुबळी मार्गावर १५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही नवीन वंदे भारत एक्स्प्रेस श्रेणीतील प्रमुख शहरांदरम्यान धावणाऱ्या प्रवाशांसाठी श्रेणीसुधारित वैशिष्ट्ये आणि सुधारित प्रवास अनुभव देईल. या ट्रेनला आठ डबे असतील आणि कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी प्रवाशांना फायदा होणार आहे. तर यामुळे पुणे आणि हुबळी दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारण्याची देखील अपेक्षा आहे. या गाडीचा उद्घाटन समारंभ पुणे स्टेशनवर सकाळी १५ सप्टेंबर रोजी ११.४५ वाजता होईल,जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे वंदे भारत एक्सप्रेसला अधिकृतपणे हिरवा दिवा दाखवतील. ही गाडी धारवाड,बेळगाव, कोल्हापूर, मिरज,सांगली, सातारा आणि कराड या सात स्थानकांवर थांबेल.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |