पुणे- पुणे स्टेशन परिसरातील एका दुकानाला आज पहाटे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. दुकानाजवळील एका लॉजमधील प्रवाशांची जवानांनी सुखरुप सुटका केली.
पुणे स्टेशन परिसरातील विल्सन गार्डन परिसरात लॉज आहे. लॉजच्या इमारतीत जनरल स्टोअर आहे. आज पहाटे साडेचार वाजता दुकानातून मोठ्या प्रमाणाव धूर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब आणि दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले आणि जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. आगीत दुकानातील साहित्य जळाले. मोठा धूर झाल्याने घबराट उडाली.
पुणे स्टेशन भागातील दुकानाला आग
